हिंगणघाट: वणा नदी पात्रातील अवैध रेती उपसा प्रकरणी वणा नदी संवर्धन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
हिंगणघाट शहरातील वणा नदी पात्रातील अवैध रेती उपसा प्रकरणी वणा नदी संवर्धन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की नदीपात्राच्या काठावरून आढळलेल्या मानवी सांगाड्याची विल्हेवाट प्रशासनाला माहिती न देता परस्पर का लावण्यात आली? यामुळे गंभीर कायदेशीर प्रश्न निर्माण होतात.याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोजणी अहवालानुसार 63.10 ब्रास रेती निष्पन्न झाले आहे.