अकोट: गांधीग्राम ते गोपालखेड मार्गावर दोन दुचाकींचा अपघात दोघेजण जखमी
Akot, Akola | Nov 1, 2025 अकोला महामार्गावर गांधीग्राम ते गोपालखेड दरम्यान शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला या अपघातामध्ये दोघेजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.यातील एक जण गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारार्थ अकोला हलवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती असून अकोट अकोला महामार्गावरील गांधीग्राम ते गोपालखेड दरम्यान काही ठिकाणी रस्ता उघडलेला असल्याने या मार्गावर अपघात घडत आहे या अंतर्गतच आजच्या घटनेत दोन दुचाकींचा अपघात झाला.