रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरात फळांची मोठी आवक; बाजारात वाढली उलाढाल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 24, 2026
आज दिनांक 24 फेब्रुवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर फळबाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जाधववाडी आणि शहागंज येथील बाजारपेठांमध्ये द्राक्षे, कलिंगड, खरबूज, पपई आणि अननस यांसारख्या रसाळ फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. दिवसभर रोजा ठेवल्यानंतर इफ्तारसाठी मुस्लिम बांधवांकडून फळांना विशेष मागणी वाढली असून यंदा फळांच्या विक्रीत सुमारे ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.