सेलू: झडशी शिवारात वाघाने पाडला शेळीचा फडशा, शेतकऱ्याचे 10 हजार रुपयांचे नुकसान
Seloo, Wardha | Oct 10, 2024 शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यावर वाघाने हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडला. ही घटना तालुक्यातील मौजा झडशी शेत शिवारात ता. 10 गुरुवारी मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान घडली. यात आदित्य धनराज चिचघरे यांचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.