कणकवली: सिंधुदुर्गमध्ये वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारणासाठी महत्त्वाचा उपक्रम
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील वाघ भाटलेवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमात न्यायव्यवस्था, ग्रामस्थ, अधिकारी आणि वकील संघटनेने सक्रिय सहभाग घेतला आहे. जलसंधारणासाठी पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.