जालना: जालना शहरात दिवाळीच्या दिवशी 6-7 ठिकाणी आग लागण्याची घटना
Jalna, Jalna | Nov 9, 2026 जालना शहरात दिवाळीच्या दिवशी माळीपुरा, जी.एस. कॉलेज, नवीन मोंढा रोड आणि मोती मस्जिद परिसरात 6-7 ठिकाणी आग लागली. अग्निशमन दलाने दोन बंब तातडीने रवाना केले आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी फटाके फोडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.