परतूर: मापेगाव खुर्द पाठीवर बस थांबा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे होत आहे हाल
Partur, Jalna | Jul 9, 2026 आज दिनांक 9 जुलै 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास परतुर तालुक्यातील मापेगाव खुर्द या पाठीवर बस थांबा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे मोठे हाल होत आहे ,कारण या ठिकाणी कुठलीही बस थांबत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना परतूर शहरात असे सेलू कडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, तरी या सर्व बाबीकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बस थांबा उभारावा अशी मागणी विद्यार्थी यांनी केली आहे.