कुरखेडा: कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांचा आंदोलनाकडे शाशनाचे दूर्लक्ष,तालूक्यातील कर्मचारी मागील १५ दिवसापासून बेमूदत संपावर
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचार्यानी नियमित शाशन सेवेत समायोजन प्रक्रीयेत होणार्या विलंबाचा निषेधार्थ व अन्य काही आपल्या मागण्याकडे शाशनाचे लक्ष वेधण्याकरीता दि.१९ आगस्ट पासून बेमूदत संप पूकारलेला आहे मात्र या आंदोलनाकडे शाशनाचे दूर्लक्ष असल्याने अद्याप तोडगा निघू शकलेला नाही त्यामूळे आरोग्याचा सूविधेपासून सामान्य जनतेला वंचित व्हावे लागत आहे पब्लिक एप प्रतिनिधिने आज दि.३ सप्टेबंर बूधवार रोजी दूपारी १२ वाजता भेट दिली यावेळी कर्मचार्यांचे आंदोलन सूरूच होते.