इराण-इराक-इजरायल तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; नातेवाईकांची माहिती प्रशासनाला द्या
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 2, 2026
आज दि 2 मार्च सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर आखातात इराण, इराक आणि इस्राईल यांच्यात निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ज्यांचे नातेवाईक इराण, इराक किंवा इस्राईलमध्ये वास्तव्यास आहेत किंवा अलीकडे त्या देशांत गेले आहेत, त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित व्यक्तींची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. यासाठी प्रशासनाने आपत्कालीन