पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या खोपडा येथील नागदेवता मंदिरात सुरू असलेल्या पौष महोत्सवाच्या सांगता समारोहाला, आज दिनांक 4 जानेवारीला सकाळी दहा वाजता पासून सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण गावातून नागदेवतेच्या पालखीची मिरवणूक यावेळी काढण्यात आली. या ठिकाणी यात्रा देखील भरत असल्याने परिसरातील भक्तमंडळीची प्रचंड प्रमाणात गर्दी असल्याने शिरखेड पोलिसांनी अत्यंत चोख नियोजन महोत्सवाच्या निमित्ताने ठेवण्यात आले आहे