धुळे: जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी, सर्व शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय
Dhule, Dhule | Aug 27, 2024 धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा, जामखेडी आणि मालनगाव या जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला होता, अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, यामुळे पांझरा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असून धुळे शहरातील ब्रिटिश कालीन असलेला मोठा पूल बंद करण्यात आला आहे, तर धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय.