धुळे: पांझरा नदीत पोहण्यासाठी उडी मारलेल्या तरुणाचा कौठळ शिवरात सापडला मृतदेह
Dhule, Dhule | Aug 26, 2024 धुळे शहरातील पांझरा नदीत पोहण्यासाठी उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह गेल्या 24 तासांनंतर धुळे तालुक्यातील कौठल शिवारात सापडला आहे. रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी या तरुणाने पांझरा नदीपात्रात पोहण्यासाठी उडी घेतली होती. अमिन पिंजारी असे मृत तरुणाचे नाव आहे. अमीन पिंजारी या तरुणाने सावरकर मार्गावरील छोट्या पुलावरून आपल्या चौघा मित्रांसह पांझरा नदीत उडी मारली होती. सर्वजण पोहून काठावर पोहोचले; परंतु अमीन पिंजारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.