धुळे: जुनी पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने साक्री रोड जुने जिल्हा रुग्णालय परिसरात निदर्शने
Dhule, Dhule | Aug 26, 2024 जुनी पेन्शन योजनेसाठी साक्री रोड परिसरात असलेल्या जुने जिल्हा रुग्णालय परिसरात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळे शहराच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी ‘जुनी पेन्शन लागू का’ अशा घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले.