धुळे: पंचवटी परिसर ते गांधी पुतळ्यापर्यंत मोठ्या पुलावर वाहतुकीसाठी नागरिकांची उडाली एकच तारांबळ.
Dhule, Dhule | Aug 26, 2024 पांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने पांजरा नदी किनाऱ्यावरील गणपती मंदिराजवळचा पूल तसेच कालिंका माता मंदिराचा पूल व सावरकर पुतळ्याजवळचा पूल हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, यामुळे एकच पूल वाहतुकीसाठी चालू ठेवल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तारांबळ उडाली होती. यावेळेस सदर ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला होता.