पालघर: भारतीय जनता पक्षाची माणिकपूर येथे संघटनात्मक बैठक संपन्न
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठकीचे वसईतील माणिकपूर येथे आयोजन करण्यात आले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी संघटनात्मक बांधणी निवडणूक नियोजना संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करत आढावा घेण्यात आला. या बैठकीस वसई विरार जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, जिल्हा सरचिटणीस जोगेंद्र प्रसाद, मनोज बारोट भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.