समुद्रपूर: सर्पदंशाने १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू:येदलाबाद येथील घटना:दंश करणाऱ्या सापाला सर्पमित्राने केले जेरबंद
येदलाबाद येथे सर्पदंशाने १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आली आहे या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या सापाला सर्पमित्राने मोठ्या सिताफीने जेरबंद करून जंगलात सोडून दिले. प्राप्त माहितीनुसार मृत्यक महैश देविदास भोमले वय १० वर्ष हा घरातील दरवाज्यावर बसून असताना अचानक बिडातून साफ निघाला व महैश याला चावा घेतला हि बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथे उपचार करून त्याला पुढील सेवाग्राम रुग्णालय दाखल केले.