समुद्रपूर: साथी पोर्टल विरोधात तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी पाळला कळकळी बंद:साथी पोर्टल अट रद्द करण्याची मागणी
समुद्रपूर तालुक्यातील कृषी व्यवसायिकांनी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर करणे विक्रेत्यासाठी शक्य नसल्यामुळे या साथी पोर्टल विरोधात तालुक्यातील सर्वच कृषी केंद्र आज सकाळपासून कळकळीत बंद ठेवण्यात आली.यावेळी कृषी व्यवसायिकांकडून साथी पोर्टलची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली या बंद मध्ये तालुक्यातील कृषी विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.