समुद्रपूर: कोरा सर्कल मधील संजय धारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जि.प.उमेदवारी जाहीर: अनेकांचा पक्ष प्रवेश
समुद्रपूर :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या कार्य नेतृत्वात तालुका अध्यक्ष महेश झोटिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरा सर्कल मधिल संजय विठोबाजी धारणे यांच्यासह जीवन नारनवरे, गणेश नारनवरे, अशोक दोडके, जगदीश नारनवरे, सुभाष नारनवरे यांनी पक्षाचा झेंडा हातात घेतला. संजय विठोबाजी धारणे यांची जिल्हा परिषद उमेदवारी जाहीर करण्यात आली असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.