उदगीर: नागलगाव परिसरात शेतकऱ्यांचा ऊस पेटला,शेतकऱ्यांचे नुकसान
Udgir, Latur | Dec 10, 2025 उदगीर तालुक्यातील नागलगाव परिसरात शेतकऱ्यांचा ऊस पेटल्याची घटना १० डिसेंबर रोजी घडली आहे, नागलगाव परिसरात शेतकऱ्यांच्या उसाला आग लागल्याचे निदर्शनास आले,या घटनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केला,ही आग कशामुळे लागली का कोणी अज्ञात व्यक्तीने आग लावली याचे कारण मात्र समजू शकले नाही, या आगीत शेतकऱ्यांच्या उसाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे