मांजरसुबा परिसरात बालाघाट डोंगररांगावर भर दिवसा खनिजाची चोरी पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्र्यांना तक्रार
जिल्ह्यातील निसर्गसंपन्न बालाघाट डोंगररांगा सर्रास गौण खनिज उपसून पोखरल्या जात आहेत. सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने तक्रारी करुनही प्रशासन कुठलीच ठोस कारवाई करण्याबाबत पावले उचलत नसल्याचे चित्र आहे. मांजरसुंबा भागात अनेक ठिकाणी गौण खनिज उपशामुळे मोठमोठ्या खदानी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. डोंगरांमध्ये मोठमोठ्या खदानी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी पर्यटन व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना तक्रार केली आहे.