अंबड: डिजिटल जनगणनेचा शुभारंभ: अंबड तालुका सज्ज; नागरिकांना स्वयं-गणनेचे आवाहन
Ambad, Jalna | Apr 29, 2026 *डिजिटल जनगणनेचा शुभारंभ: अंबड तालुका सज्ज; नागरिकांना स्वयं-गणनेचे आवाहन* अंबड (प्रतिनिधी): देशातील १६व्या जनगणनेच्या प्रक्रियेला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, अंबड तालुका या ‘डिजिटल जनगणना’ उपक्रमासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच नागरिकांना ‘स्वयं-गणना’ (Self-Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया १ मेपासून सुरू होत असून, १५ मेपर्यंत नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी व घरगणना