समुद्रपूर: जाम जवळील सुदर्शन जिंनीग जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, समुद्रपूर पोलिसांनी केला पंचनामा
जाम मार्गावरील सुदर्शन जिंनीग जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली, या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. प्राप्त माहितीनुसार सोमवारी २९ एप्रिलला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विठ्ठल धोटे राहणार तास हे आपल्या दुचाकीने समुद्रपुरकडून जामकडे जात असताना जाम जवळील सुदर्शन जिंनीग जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात धोटे यांचा जागीच मृत्यू झाला. समुद्रपूर पोलिसांनी पंचनामा केला.