समुद्रपूर: नागपूर वरुन गिरड गावी दुचाकीने परत येत असलेल्या आजोबा मुलगी व नातीन या तिघांचा बुट्टीबोरी जवळ अपघाती मृत्यू
गिरड येथील पुणिराम येनुरकर हे साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे २८ एप्रिलला गेले होते.तेथे साक्षगधांचा कार्यक्रम आटोपून ते आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.३२ ए.एम.१९९६ ने त्यांची मुलगी सुचिता दांडेकर वय ३५ वर्ष व नातीन खुशी सुधिर वय १५ वर्ष राहणार या दोघिंसह २९ एप्रिलला ११ .३० वाजताच्या सुमारास गावाकडे परत येत असतांना बुट्टीबोरी जवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात पुनिराम येनुरकर यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी सुचिता व नाती खुशी यांचा उपचारासाठी नेतांना मृत्यू झाला