अंबड भागात सावता नगर, सिडको येथून सोळा वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची 16 वर्षी अल्पवयीन मुलगी ही घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून गेली.तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून पळून नेले.