नागपूर ग्रामीण: मध्य प्रदेशात भीषण अपघात: उभ्या ट्रकला कार धडकल्याने नागपूरच्या ३ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
मध्य प्रदेशातील मुलताई बायपासजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात बुटीबोरी येथील ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दीपक राऊत, छाया राऊत आणि प्रभा खराते अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.बुटीबोरी येथील हे सर्व भाविक कार क्रमांक ने शिव दर्शन, शिव मंदिरातील प्रवचन आणि कावड यात्रेसाठी मध्य प्रदेशच्या दिशेने निघाले होते.