पुण्यातील नऱ्हे परिसरातील भूमकर पुलावर मोठा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांची एकमेकांना धडक झाली. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर एक चालक वाहनात अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, अधिकृत माहितीनुसार मृतांचा आणि जखमींचा आकडा बदलू शकतो. विशेष म्हणजे, चार-पाच दिवसांपूर्वी दरी पूल परिसरातही भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आता भूमकर पुलावर झालेल्या या अपघातामुळे पुण्यातील पुलांवरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
#PuneNews #RoadAccident #BhumkarBridge #timesofMaharashtraNews
Pune City, Pune | Sep 19, 2026