परिमंडळ ७ यांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ तर्फे अवैध धंद्यांवर प्रहार!
चंदननगर पोलीस ठाणे येथे मटका व जुगार अड्ड्यावर धाड टाकत ९ आरोपींना ताब्यात घेतले. तसेच रोख रक्कम, ३ दुचाकी, ६ मोबाईल फोन, जुगार साहित्य असा एकूण ₹२,३१,५८५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वाघोली पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना अटक करत १५.८० ग्रॅम एम. डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगाराविरोधात कारवाई करत रोख रक्कम व जुगार साहित्य असा ₹१,७७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली.
नागरिकांना आवाहन आहे की अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती असल्यास तत्काळ पुणे शहर पोलिसांना द्यावी.
#MissonCrackdown #PunePolice