नागपूर ग्रामीण: वाठोडा रोडवर चालत्या स्कूल बसला अचानक आग; खिडकीतून काढले चिमुकल्यांना बाहेर
वाठोडा रोड परिसरात एक मोठी दुर्घटना टळली असून, एका स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ एकच तारांबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बसमधील सर्व मुलांना खिडकी मधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.या घटनेमुळे स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला