जळगाव: मेहरूण येथील तरूण झाला बेपत्ता; एमआयडीसी पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद
जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणारा तरूण हा बाहेर जावून येतो असे सांगून शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ३० नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.