परतूर: बंजारा समाजाचे प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज यांचे सुरूमगाव तांडा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Partur, Jalna | May 14, 2026 आज दिनांक 14 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सुरूमगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज यांचे भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला ते प्रबोधन करत होते यावेळी त्यांच्या छातीत चमक निघली आणि ते खाली पडले यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यातच त्यांची प्राणजोत मालवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.