सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेळाव्यात 15 कोटींचे कर्जवाटप अमरावती, दि. २९ : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने विविध कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी आउटरीच कॅम्पचे आयोजन शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या मेळाव्यात ग्राहकांना पंधरा कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे अभियंता भवन येथे रिटेल क्रेडिट आउटरीच कॅम्प पार पडला. प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय पवार अध्यक्षस्थानी होते. l