हिंगोली: हिंगोलीतील बालगृहात जिल्हा अधिकाऱ्यांसोबत आनंदात साजरी झाली दिवाळी
हिंगोली येथील श्री स्वामी समर्थ मुलांच्या बालगृहात जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. बालकांना भेटवस्तू, फटाके, आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षण आणि सुरक्षिततेचे महत्त्वही समजावण्यात आले.