येवल्यातील दुचाकी चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक दुचाकी हस्तगत पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांची प्रसिद्धी माध्यमांना प्रत
Nashik, Nashik | Oct 23, 2026 येवला शहरातील विठ्ठलनगर परिसरातून सेवा निवृत्त शिक्षकाची दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी येवला शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथून एका आरोपीला अटक केली असून जागरण दुचाकी देखील जप्त करण्यात हस्तगत करण्यात आली आहे. येवल्यातील विठ्ठल नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक अरुण रामभाऊ केकाणे यांच्या घरासमोरील पोर्चमधून दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी साहिल राजेश चव्हाण रा. शनिदेवगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहेत. बाईट : संदीप मंडलिक - पोलीस निरीक्षक