समुद्रपूर: मांडगाव येथे जलजीवन योजनेअंतर्गत खोदकामात खड्डे पडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन
मांडगाव येथे जल जीवन योजने अंतर्गत बऱ्हाणुरे वार्ड नं दोन मध्ये तसेच विकास विद्यालय शाळेमागे उरकांदे यांच्या घरासमोरून तर निमजे यांच्या दुकानापर्यंत आदमने यांच्या घरापासून तर वडूले यांच्या घरापर्यंत पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात आले यावेळी सिमेंटीकरण रस्त्यांच्या मधोमध पाईपलाईन टाकल्यामुळे रस्त्यावर मधोमध खड्डे पडले आहे त्यामुळे चीखलाचे साम्राज्य निर्माण झाले तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.