समुद्रपूर: मांडगाव येथील युवकांनी जखमी माकडाच्या पिल्याला केले वनविभागाच्या स्वाधीन:पिल्याची वर्ध्याच्या करुणाश्रमात रवानगी
मांडगाव येथे २३ जुन रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास एका मादी माकडाला व तिच्या पिलाला विजेचा झटका लागला त्यात मादी वानर मृत पावले त्याचे पिल्लू मादीच्या मृतदेहाशेजारी पडून होते ,काही युवकांना ते जखमी अवस्थेत आढळून आले त्यांनी त्या पिलाला घरी आणून दूध पाजले ,पाणी पाजले व वन्यजीव रक्षक फाउंडेशनचे राकेश झाडे यांच्याशी संपर्क साधला राकेश झाडे यांनी समुद्रपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली त्यांनी वाहन पाठवून पिल्याला वर्धा येथे पाठविले.