समुद्रपूर: जाम येथील शेतकरी महिला निधी लिमिटेड शाखेतील रक्कम व्याजासह परत करा, लहान व्यवसायिकांचे तहसीलदारांना निवेदन
समुद्रपुर तालुक्यातील जाम येथिल शेतकरी महिला निधी लिमिटेड जाम शाखेतील खातेदारांना पैसे परत देत नसल्याने खातेदारांनी २६ जुन रोजी ३ वाजता तहसील कार्यालय गाठून तहसीलदार कपिल हाटकर यांच्याकडे निवेदन देत व्याजासहित रक्कम परत करन्याची मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी माजी सरपंच सचिन गावंडे,दिगबर तडस, गजानन खेडेकर,दिनेश कारमोरे, श्यामसुंदर मांडवकर,रितेश वाटकर, साईनाथ खेडेकर,साईनाथ भगत,पद्माकर दांडेकर,रविंद जोहरी, पूनम तडस,जोसना नरुले,लकेश अवघडे व इतर खातेदार उपस्थित होते.