नांदगाव खंडेश्वर: समृद्धी महामार्गा वर अपघातात मृत्यू झाल्याने वाहन चालकावर गुन्हा दाखल
३ जुलै ला सकाळी सहा वाजता मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 142 वर चार चाकी वाहनाचा समोरील टायर फुटून वाहन डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात शुभम सुखदेव लुंगे या वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. वाहन चालकाचा भाऊ प्रफुल सुखदेव लुंगे यांनी 4 जुलै रोजी दुपारी ३ वाजुन १९ मिनिटांनी मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून या अपघातात फिर्यादीचा भाव शुभम हा वाहन चालवीत असल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.