हिंगोली: हिंगोलीत नवीन एमआयडीसीसाठी शासनाकडून सकारात्मक पाऊल
हिंगोलीमध्ये नवीन औद्योगिक क्षेत्र उभारण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हायपॉवर कमिटीसमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या 4 औद्योगिक क्षेत्रे कार्यरत असून रोजगार व उलाढालीत मोठी वाढ अपेक्षित आहे.