धुळे: देवपूर विघ्नहर्ता कॉलनी परिसरातून दुचाकीची चोरी, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 26, 2024 धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या विघ्नहर्ता कॉलनीतील रहिवासी उमेश प्रल्हाद भंडारकर वय 42 विघ्नहर्ता कॉलनी देवपूर धुळे यांची दुचाकी कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यांनी परिसरात व मित्र परिवारामध्ये शोध घेतला पण दुचाकी मिळून न आल्याने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.