धुळे: देवपूरच्या न्यू सुयोग कॉलनीतील बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Dhule, Dhule | Aug 25, 2024 देवपूरच्या न्यू सुयोग कॉलनीतील एका घरात बनावट दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी बनावट देशी दारू, स्पिरीट, इसेन्स, लेबल, मशीनरी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत 8 लाख 59 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.