धुळे: पांझरा नदी गणपती मंदिर जवळील लहान पूल वाहतुकीसाठी बंद जिल्हाप्रशासनाची माहिती
Dhule, Dhule | Aug 25, 2024 धुळे शहरातील पांझरा नदी वरील गणपती मंदिर जवळील लहान पूल २५ ऑगस्ट रात्री ९ वाजेच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.अशी माहिती २५ ऑगस्ट रात्री ९ वाजेच्या दरम्यान जिल्हा प्रशासन वतीने देण्यात आली आहे.जिल्ह्यात दोनदिवसांपासून संततधार पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा येवात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात २५ ऑगस्ट रविवारी रात्री १८ हजार क्युसेस पाणी विसर्ग करण्यात आले आहे.पांझरा नदी पात्रात पाण्याचा येवा वाढ झाली आहे.पांझरा नदी पात्र दुथडे भरुन वा