मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान रविवारी २ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात खळबळ उडाली आहे.