बसमत: तालुक्यासह जिल्हातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करत जिल्हाधिकाऱ्यांन निवेदन दिले
वसमत तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने सादर करत घोषणाबाजी करत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून 50 हजार रु हेक्टरी सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .यावेळी वसमत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .