विक्रोळीत उत्कर्ष शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर
विक्रोळीत उत्कर्ष शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आज बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी विक्रोळी कन्नमवार नगर येथे असलेल्या उत्कर्ष शाळेच्या वतीने उत्कर्ष बाल मंदिर शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .यामध्ये रक्त तपासणी ,मधुमेह तपासणी ,दात तपासणी , डोळे तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप करण्यात आले .शाळेतील पालकांनी या तपासणीत सहभाग घेतला .