भोकरदन: गावठी हातभट्टी दारू चा अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त, शेलुद परिसरातील कारवाई
आज दिनांक 20 जुलै 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धरण परिसरामध्ये दिनांक 18 जुलै 2025 रोजी पारद पोलीस ठाण्याची सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धरण परिसरात सुरू असलेली गावठी हातभट्टीचा दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे यामध्ये 300 लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी नष्ट केली असून तीस हजार रुपयांचा मध्यमान नष्ट केला आहे ,सदर प्रकरणात आकोस तडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.