भोकरदन: शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला अटक करा; केदरखेडा येथे जालना भोकरदन महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
आज दिनांक 19 जुलै 2025 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे भोकरदन जालना या मुख्य महामार्गावर केदरखेडा येथील व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत मागणी केली आहे की केदरखेडा गावातील भुसार मालाचे व्यापारी पवन केवट याने शेतकऱ्यांचा शेतीमाल मका, सोयाबीन, गहू हा विकत घेतला मात्र शेतकऱ्यांना पैसे दिले नाही यात शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असून त्याला अटक करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केला.