भोकरदन: पिकपची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी,धावडा गावाजवळील अजिंठा बुलढाणा महामार्गावरील घटना
आज दिनांक 19 जुलै 2025 वार शनिवार रोजी सायंकाळी 6वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळील अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर भडगाव पिकप गाडीने दुचाकीला जोराची धडक दिली आहे, यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला एक साथीदार गंभीर जखमी झाला आहे,मात्र दोघांची ही नावे कळू शकलेली नाही, सदर अपघाताची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.