समुद्रपूर: शिवणफळ येथे कुत्राच्या हल्लात जखमी हरणाच्या पिल्लाला नागरीकांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान
शिवणफळ येथील जंगलातून भटकलेले हरणाचे पिल्लू गावाकडे आले यावेळी गावातील मोकाट कुत्राने हरणाच्या पिल्यावर हल्ला चढवित त्याला जखमी केले. या घाबरलेल्या हरणाचे पिल्लू आपला जिव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत पत्रकार गजानन गारघाटे यांचे घरात शिरले यावेळी गजानन गारघाटे, पुणेश उमाटे यांनी गावातील नागरीकांच्या सहकार्याने या पिल्याला मोठ्या सिताफने पकडून दुचाकी मांडून उपचारासाठी गिरड येथिल पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार करण्यात आला.