वरुड झुली शेतशीवारामध्ये वाघाची डरकाळी ने शिरकाव झाल्याची घटना उघडकीस आली. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व शेतमजूर हे कामासाठी जात असताना वाघाचे पाऊलखुणा दिसल्याने सर्वत्र धास्ती पसरली आहे. याची माहिती वन विभागाला मिळतात वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले.