परतूर: वाटुर गावासह तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने बळीराजा खरीप पेरणीच्या कामात व्यस्त
Partur, Jalna | Jun 25, 2026 आज दिनांक 25 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटुर गावासह गोळेगाव तसेच संपूर्ण तालुक्याभरात बळीराजा खरीप पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले आहे, कारण मागील दोन दिवसापासून संपूर्ण तालुक्यात व जिल्हाभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे बळीराजा खरीप पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत असून यामध्ये मका सोयाबीन कपाशी मोठ्या प्रमाणात लागवड सुरू असल्याचे तालुक्यातील शेत शिवारात पाहायला मिळत आहे.